दादालोरा खिडकी काय आहे ? | Gadchiroli Police Dadalora Khidki
सध्या सगळीकडे चर्चा होतेय ती म्हणजे Dadalora खिडकी या उपक्रमाची. पण नेमके काय आहे पोलीस दादा लोरा खिडकी, कोणी व कशासाठी आहे ही खिडकी ? याबद्दल जाणून घेऊया.
पोलीस दादा लोरा Civic Action Team
गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग भामरागड येथे प्रायोगिक तत्वावर सदर योजना सुरू करण्यात आली. या खिडकीची सुरुवात करण्याचा हेतू म्हणजे, या दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून आदिवासी जनतेला विविध शासकीय योजना, शासकीय दाखले, उच्च दर्जाचे कृषी बियाणे, रोजगार व स्वयंरोजगार अशा अनेक योजना एका खिडकीच्या राबिवणे हा होता.
लवकरच या योजनेला लोकांचा उत्फुर्त प्रतिसाद व सहभाग दिसून आला त्यानंतर सर्व पोलीस / उप पोलीस स्टेशन व पोलीस मदत केंद्र च्या ठिकाणी पोलीस दादालोरा खिडकी तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक दादा लोरा खिडकी अंतर्गत एक Civic Action Team कार्य करीत आहे.
सध्या गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्यात ५३ दादा लोरा किडक्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
Dadalora Khidki ची सुरुवात
गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून जानेवारी २०२१ मध्ये पहिल्यांदा भामरागड तालुक्यात पाहिली दादा लोरा खिडकी सुरू करण्यात आली.
नावा हक्का था खिडकी
या खिडकीच्या माध्यमातून हजारो नागरिकांना विविध योजना व शासकीय दाखले, माहिती व मदत पुरविण्यात आलेली आहे. या योजनेची दखल घेत अरुण बोनगिरवार फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा अरुण बोनगिरवार सार्वजनिक सेवा उत्कृष्ट पुरस्कार २०२१ हा गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांना प्रदान करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box