Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

YouTube वरून पैसे कमवायला काय करावे लागते ? | By Gadchirolikar

YouTube वरून पैसे कमवायला काय करावे लागते ? | By Gadchirolikar


जचा विषय म्हणजे सध्याच्या तरूण आणि तरुणींना आकर्षित करणारा विषय आहे. तो म्हणजे आपण YouTube Channel बनवून पैसे कसे कमवू शकतो यावर आज माहिती पाहणार आहोत. आपल्याला अनेक जण वेगवेगळ्या विषयावर YouTube Videos टाकत असताना पाहतो. सोबत हे पण पाहतो की, त्यांनी या महिन्यात 200 डॉलर कमविले, कोणी सांगतो की, त्याने 25,000 रू. एका व्हिडिओमधून कमविले. अशा प्रकारच्या Ads वैगेरे तुम्ही पाहतच असाल. यात काही जण खोटारडेपणाने केवळ आपल्या विडिओला व्ह्यू आणण्यासाठी म्हणा किंवा आपले Subscriber वाढविण्यासाठी हा सर्व खटाटोप करत असतात. मग हे Views किंवा Subscriber कशासाठी हवेत ? ह्यातच YouTube ची कमाई दडलेली असते. ती कशी आणि खरचं Views आणि Subscribers मुळेच आपण YouTube वरून कमवू शकतो का ? किती Views आणि किती Subscribers किमान पाहिजेत ज्यामुळे आपण कमवू शकू या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज या ठिकाणी सुटणार आहेत. माहिती पूर्णपणे आणि काळजीपूर्वक वाचा आणि YouTube वरून तुम्ही पण कमवायला लागा. 




YouTube वरून कमाई कशी होते ? 

सर्वात प्रथम तुम्ही YouTube वरून कमवायचे कसे हे जाणून घेण्यापूर्वी YouTube kay aahe ? आणि YouTube channel kase Banvayche ? हे जाणून घ्या. या विषयी माहिती आपल्या ब्लॉग च्या YouTube Tips ऑप्शन्स वर भेटून जातील. 

अशी होते YouTube वरून Income

सर्वात प्रथम Youtubers मार्फत YouTube Channel बनवून त्यात Videos Upload केले जातात. कालांतराने त्या व्हिडिओज वर Viewers येतात. म्हणजेच त्या Youtuber ने टाकलेले व्हिडिओ लोकांकडून पाहिले जाते. Video सुरू असताना, व्हिडिओच्या मध्ये किंवा व्हिडिओच्या सरतेशेवटी काही जाहिराती दाखविल्या जातात. त्या जाहिराती अनेकांनी पहिल्याच असतील. त्याच जाहिराती आपल्या चॅनल वर दाखविण्याचे पैसे त्या चॅनल मालकाला दिले जातात. ही प्रक्रिया एकदम गुंतागुंतीची वाटत असली तरी ती एकदम सोपी आणि सुलभ आहे. आपण याआधी टीव्ही वर सुध्दा या जाहिराती पाहिल्या आहेत. त्या टिव्ही वाल्यांना सुध्दा जाहिरातीचे पैसे मिळत आलेले आहेत. अगदी त्याचप्रमाणे चॅनल मालकाला जाहिरातीचे पैसे दिले जातात. 

YouTube चे पैसे कोण देतो ?

साधारणतः मला अनेक मित्रमंडळी कडून हा प्रश्न नेहमीच विचारला जातो की, YouTube चे पैसे कोण देतो ? तर त्याचे उत्तर म्हणजे Google देत असतो. म्हणजेच YouTube च्या प्लॅटफॉर्म वर Google AdSence द्वारे Advertisement दाखवून त्याच Google AdSense Account ला पैसे दिले जातात. आणि ते मग Systematically आपल्या बँक खात्यात जमा केले जातात. YouTube हा Google चा एक व्हिडिओ Sharing Platform आहे त्यामुळे YouTube वरची income गूगल कडून दिली जाते. सर्वात प्रथम Google कडे अनेक जाहिराती देऊ पाहणारे कंपनीचे व्यवस्थापकीय मंडळी YouTube ला जाहिरात टाकण्यास विनंती करतात. Google कडून त्या जाहिराती टाकण्यास रक्कम आकारली जाते. जाहिराती च्या झालेल्या एकूण रकमेच्या 45 टक्के रक्कम YouTube म्हणजे Google स्वतः ठेवतो आणि 55 टक्के रक्कम ज्या चॅनल वर जाहिरात दाखविली गेली त्या चॅनल मालकाला देतो. मग आता आपण पाहूया नेमके काय हवे असते आपल्या चॅनल वर ज्यामुळे आपणास YouTube किंवा Google पैसै देईल.

1. 1000 Subscriber 

YouTube चा एक Criteria आहे. जो Subscriber शी निगडित आहे. ज्यामधे आपल्याला आपल्या चॅनल वरून Advertisement ने किंवा Google Ads ने पैसे कमविण्यासाठी आपल्या चॅनल वर कमीत कमी 1000 subscriber complete असणे आवश्यक असते. हे एक हजार Subscriber Complete झाले की, आपण Monetization Apply करू शकतो. 


2. 4000 Hours Watchtime

ही दुसरा आणि सर्वात महत्वाचा घटक आहे कोण Criteria आहे. 1000 Subscriber पुर्ण केल्यानंतर तुमच्या चॅनल वर 4000 तास इतका व्हिडिओ पहिला गेला पाहिजे. म्हणजेच 4000 तासांचा व्हिडिओज चा Views Hours ही एक पात्रता आहे जी खूप महत्वपूर्ण आणि खरी कस लावणारी आहे, पण तुमच्या सातत्यपूर्ण आणि योग्य कार्याने ते पूर्ण करणे नक्कीच शक्य आहे.

3. YouTube Monitize होण्यासाठी म्हणजेच पैसे कमविण्यासाठी आणखी महत्वाचे म्हणजे तुमच्या चॅनल वर असे कोणतेही व्हिडिओज अपलोड नसावे जे दुसऱ्याचे आहेत त्या सर्व गोष्टी YouTube Reuse Content समजतो व त्याला नाकारतो. त्यामुळे व्हिडिओज हे स्वतःचे असावे. कोणतेही सामाजिक, धार्मिक भावना दुखावणारे, आक्षेपार्ह व Sexual Content नसावेत. 
ह्या सर्व बाबी आणि अटी पूर्ण केला की, आपण YouTube ला video upload करून नक्कीच कमवू शकतो. आणि अनेक जण कमवत सुध्दा आहेत.

माहिती आवडली असेल तर आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आणि ही माहिती पुढे आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद !

Sai Gedam ( Marathi Blogger\Youtuber ) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या