स्वतःचे YouTube Videos आणि Blogs पाहावे की नाही ? | Don't Watch Own YouTube Videos
![]() |
Image : pixels.com |
मित्रांनो, नमस्कार तूम्ही जर एक Blogger असाल किंवा YouTube वर व्हिडिओज Upload करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तूम्ही आपल्या चॅनल वर Upload केलेले व्हिडिओज पाहत असाल, किंवा तुम्ही ब्लॉगर वर Publish केलेली पोस्ट स्वतःहून वारंवार वाचत असाल तर, काही वेळेस आपण नवीन नवीन माहिती, व्हिडिओज वैगेरे टाकत असतो, काही वेळेस नवीन नवीन Google AdSense Approval मिळाल्याने उताविळ होऊन आपण आपल्या Video व Blog वर जात असतो तर हे अजिबात योग्य नाही.
बऱ्याच लोकांना माहीत असते की आपण स्वतःचे व्हिडिओज पाहू नये, पण काही जणांना ते माहीत नसते त्यामुळे ते सतत आपले व्हिडिओज आपणच पाहत बसतात. मग अनेकांना प्रश्न पडतो की, आपले स्वतःचे व्हिडिओज, पोस्ट पाहावे की, नाही ? आणि पाहिलेच तर काय होईल ? या सर्व बाबींचा विचार आपण या लेखात करतो आहोत.
सर्वात प्रथम जर आपण आपले Bloggers वरचे Articles किंवा YouTube चे स्वतःचे व्हिडिओ पाहिलेच तर काय होईल? काय याचा काही वाईट परिणाम आपल्या ब्लॉग वर किंवा YouTube Channel वर होईल का ? तर याच साधं उत्तर आहे, हो. त्याचा परिणाम आपल्या चॅनल वर होईल. आता तुम्ही इतके वाचून पुढे जर मी काय सांगतो आहे ते ऐकले नाहीत तर तुम्हाला अपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही खूप विचारात पडू शकता. त्यामुळे माहिती आधी पूर्णपणे समजून घ्या की, जर परिणाम होतो तर नेमका कोणता परिणाम होईल. आणि कसा परिणाम होईल. मग करायचं काय ? यावर पुढे पाहूया.
स्वतःचे व्हिडिओज स्वतः का पाहू नये?
समझा तुम्ही एक Advertiser आहात. आणि तुम्ही Google Ads ने YouTube किंवा वेबसाईट वर आपल्या Advertisement दाखवू पाहत असाल तर तुमचा त्यामगचा हेतू हा असेल की, ती Advertisement योग्य Viewers कडे जायला हवी. आणि तीच Advertisement समझा तुम्ही स्वतः म्हणजेच एक Creator वारंवार पाहतो आहे. त्यात त्या Advertisement करणाऱ्याचा काय फायदा ? एकदा का तुमच्याकडून Advertisement पाहिली गेली तर त्या Advertiser चे पैसे Deduct होतील पण ते योग्य ठिकाणी किंवा Audiences वर खर्च न होता तुमच्यावर खर्च झाले. अशा वेळी Google Ads ला हे नको हवे असते म्हणून त्यांनी तुम्ही स्वतः पाहण्यावर अटकाव करतो. किंवा पाहण्याची संमती देत नाही.
Google हे आज जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. त्यामुळे बहूतेक Advertiser सर्वात प्रथम आपल्या Advertisement Google च्या कडे दाखविण्यास प्राथमिकता देतात किंवा त्यांची पहिली पसंती असते. आणि Google ने सुध्दा आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे व पुढेही टिकवून राहावी म्हणून Google कडून कधीच Advertiser चे पैसे वाया घालवले जात नाही. तो Systematically तुम्ही पाहिलेल्या व्हिडिओज किंवा पोस्ट वरील Deduct झालेला Revenue त्या Advertiser ला परत करतो. Google कडे प्रगत तंत्रज्ञान असून तो तुम्ही पाहिलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवतो आणि जितके तुमच्या स्वतःच्या View ने Clicks ने आलेले पैसे परत करून घेतो. आणि असे वारंवार होत राहिल्यास तुमच्या AdSense Account ला Desable किंवा Suspened सुध्दा करू शकतो. त्यामुळे स्वतःचे व्हिडिओज , पोस्ट पाहणे टाळावे. आणि यामुळेच Advertiser's चे Google वर नितांत विश्वास आहे.
स्वतःचे व्हिडिओज,पोस्ट का पाहावे लागते? आणि कसे पाहायचे ?
स्वतःचे व्हिडिओज स्वतः आपण नाही पाहू शकत आणि आपण लिहिलेला ब्लॉग स्वतः पण नाही वाचू शकत तर मग आपण तो कसा पाहायचा ? मग अजिबातच पाहायचा नाही का? आणि पहायची तीव्र इच्छा जागृत झाली तर मग. मित्रांनो, तुम्हाला तुमचा व्हिडिओ कशासाठी पाहायचा आहे ? काय पाहायचा आहे त्यात. पाहायचाच कशाला. हेच ना की, मी लिहिलेला ब्लॉग कसा दिसत असेल ? मी व्हिडिओ कसा बनविला आणि तो प्रत्यक्ष कसा दिसतो वैगेरे. हे सर्व येते मग Development च्या संबंधी. आपण आपला व्हिडिओ कसा बनविला आहे, आवाज वैगेरे किंवा ब्लॉग लिहिले असाल तर, Layout कसा आहे. व्यवस्थीत झाले की नाही हे पाहायला. मग यावर उपाय आहे. त्याच विषयी आता पुढे पाहूया.
आपले YouTube Videos आणि Blog कसे पाहायचे ?
समजा तुम्हाला तुमचा व्हिडिओ, Blog Post पाहायचा असेलच त्यात काही सुधारणा करायच्या असतील तर, त्यासाठी त्या संबधित Creator साठी एक Special Creator Section असतो. त्याठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा व्हिडिओ अथवा पोस्ट पाहू शकता. कारण तो खास चॅनल व ब्लॉग चालकासाठी Section दिलेला आहे. त्याठिकाणी फक्त Creator साठी व्हिडिओज असतात आणि त्यात कुठल्याही प्रकारची Advertisement येत नाही. advertisement ही फक्त Viewers साठीच असतात. त्यामुळे तुम्ही Creator मध्ये जाऊन बिनधास्त व्हिडिओ अथवा ब्लॉग पाहू शकता. Blogger मध्ये तुम्हाला Post Preview सुध्दा Options आहे. त्यामधून पाहिल्यास कोणताही परिणाम होणार नाही.
जर चुकून, न चुकून Advertisement तुमच्याकडून पाहिली गेली तर अशा वेळी काय होईल ? अशा वेळी अजिबात काळजी करू नका. काही वेळेस नकळत चुका होतातच आणि Google सुध्दा ही गोष्ट काही वेळेस समजू शकतो. पण वारंवार स्वतःहून तुम्ही पाहत असल क्लिक करत असाल तर ते धोक्याची घंटा आहे.
मित्रांनो, ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजली असेल. आवडली असेल तर एक शेअर नक्की करा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या साईट ला भेट देत राहा. धन्यवाद !
Sai Gedam ( Marathi Youtuber/Blogger )
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box