Gadchirolikar :
25 August 2022 : गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी दिनांक १९/०६/२०२२ रोजी लेखी परीक्षा पार पडली. त्यानंतर भरती परीक्षेचा पुढील टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी परिक्षा. विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी विषयी असलेली प्रतीक्षा आता संपत असून लवकरच ही चाचणी होणार आहे आणि त्याविषयी पोलीस विभागामार्फत सूचना, पात्र उमेदवार आणि तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार काय Update आहे याची माहिती खालीलप्रमाणे.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मैदानी ( शारीरिक चाचणी) परिक्षेकरीता दिनांक अनुक्रमे ६,७ आणि ८ सप्टेंबर २०२२ ह्या तारखेला चाचणी घेण्यात येईल. पात्र उमेदवार यादी, बैठक क्रमांक आणि मैदानी चाचणी विषयी सूचना व माहिती गडचिरोली जिल्हा पोलीस यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
याआधी गडचिरोली पोलिस शिपाई 2022 च्या मैदानी चाचणी करीता पात्र उमेदारांची यादी दिनांक १२ जुलै २०२२ रोजी गडचिरोली पोलीस यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यादीतील अंतिम पात्र उमेदवार यांना बैठक क्रमांकानुसार शारीरिक चाचणी साठी बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे सदर उमेदवारांनी आपल्या दिलेल्या तारखेनुसार एम. टी. मेन गेट, पोलिस मुख्यालय, गडचिरोली येथे सकाळी ०४:३० वाजता हजर राहावे अशी सूचना आहे. सोबतच ०५:०० च्या नंतर प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी दखल घ्यावी.
परीक्षेला जातांना उमेदवारांनी आपल्या ०५ पासपोर्ट साईज फोटोज् आणि आपल्या पोलीस भरती लेखी परीक्षेचा प्रवेश पत्र सोबत न्यायचा आहे.
चाचणी परीक्षेला जातांना मोबाईल किंवा इतर कोणतेही इले्ट्रॉनिक्स साहित्य सोबत घेऊन जाण्यास परवानगी नसणार आहे.
उमेदारांनी अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था स्वतः करून म्हणजे सोबत घेऊन जायचे आहे. याची व्यवस्था स्वतः करायची आहे.
दुर्गम भागात राहत असलेल्या उमेदवारांनी निर्धारित वेळेत पोहवण्यास असलेला प्रवास आधीच करावा.
मैदानी चाचणी करीता येतांना सोबत लागणारे कागदपत्रे. यामधे ,
१. जन्म दाखला
२. शाळा सोडण्याचे प्रमाणत्र (TC ), किंवा शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
३. ७ वी/१०वी/१२वी/ पदवी/पदव्युत्तर चे शैक्षणिक प्रमाणपत्र व माजी सैनिक यांसाठी सैनिक बोर्ड प्रमाणपत्र
४. जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
५. जात वैधता प्रमाणपत्र
६. महिला/माजी सैनिक/ खेळाडू/होमगार्ड/ प्रकल्पग्रस्त/भुस्कंपग्रस्त/अंशकालीन कर्मचारी/पोलीस पाल्य/अनाथ असल्याचे प्रमाणपत्र
७. MS CIT संगणक हाताळली बाबतचे प्रमाणपत्र
८. हलकी वाहन चालविण्याचा परवाना
९. आधार कार्ड, PAN CARD, voter ID card यापैकी कोणतेही एक व पोलीस भरती संदर्भात इतर सर्व कागदपत्रे
शारीरिक चाचणीच्या दिवशी ही सर्व कागदपत्रे आवश्यक असून पुढे कोणतीही संधी मिळणार नाही. याची उमेदवारांनी दखल घ्यावयाची आहे.
शारीरिक चाचणी परिक्षा करीता पात्र उमेदवार यांनी पोलीस भरती बाबत सूचनांचे अवलोकन करणेसाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर, वर्तमान पत्रातील जाहिरात तसेच पुढे दिलेल्या लिंक चे अवलोकन करावे.
उमेदवारांना वैद्यकीय समस्या उद्भवल्यास डॉक्टर यांच्या सल्यानुसार शारीरिक चाचणीत भाग घ्यावे. उमेदवारांना मैदानावर आक्षेप असल्यास त्याबाबत पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचा निर्णय अंतिम असणार आहे. उमेदवारांना मैदानी चाचणी परिक्षा करीता जातांना सोबत ब्ल्यू पेन सोबत घेऊन जायचे आहे. जातांना घेऊन जात असलेल्या वस्तू वा सामानाची जबाबदारी उमेदवारांनी स्वतः घ्यायची आहे. दरम्यान उमेदवारांनी कोणत्याही आमिषेस बळी पडू नये तथा कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष दाखवत असेल तर समाधान कक्ष, गडचिरोली मोबाईल क्र. ८८०६३१२१०० तसेच उपविभागीय कार्यालय/पोस्टे/उप पोस्टे/पोमके येथे संपर्क साधावा. उमेदवारांना कोणतीही अडचण अथवा समस्या उद्भवल्यास समाधान कक्ष, गडचिरोली मोबाइल क्र. 8806312100 यावर संपर्क साधावा अशा प्रकारची माहिती व सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
टीप : विद्यार्थी मित्र व मैत्रिणींना विनंती आहे की, त्यांनी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध असलेल्या माहितीतून संपूर्ण वाचून घ्यावी.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box