You Tube मधील End Screen काय आहे ? ; What is end poster in You Tube ?
मित्रांनो youtube विषयी आपण विविध प्रकारची माहिती या ब्लॉग वर पाहत असतो. अशाच प्रकारच्या माहिती साठी आपल्या ब्लॉग ला Subscribe करून घ्या.
आज आपण पाहणार आहोत कि, End Screen म्हणजे काय ? का येते ? त्याचे फायदे काय ? आणि यासोबतच ते कशा प्रकारे आपण लावू शकतो याबद्दल माहिती आज पाहूया.
End Screen म्हणजे काय ?
You Tube वर व्हिडिओस पाहत असतांना व्हिडिओच्या एकदम शेवटी आपण पाहतो कि, स्क्रीन वर विडिओ दिसतात. त्यावर आपल्याला टच करून ते विडिओ पाहता येतात त्यालाच End Screen म्हणतात. यामध्ये कधी कधी दोन विडिओ किंवा त्यापेक्षा अधिक विडिओ दिसतात. तर कधी कधी ते दिसत नाही. End Screen ला विडिओ दिसत नाही हे फक्त त्या व्हिडिओस टाकणाऱ्या चॅनेल चालकावर अवलंबून असते. त्याने End Screen लावलीच नसेल तर ते नाही.
End Screen लावण्याचे फायदे.
End Screen लावल्यामुळे जो व्यक्ती विडिओ शेवटपर्यंत पाहतो त्याला आपल्या चॅनेलवरील दुसऱ्या व्हिडिओस ची एकंदरीत झलक पाहायला मिळेल. म्हणजेच त्याला हे समजेल कि, पुन्हा त्याला आवडणारे किंवा पाहिजे असणारे व्हिडिओस आहेत तेव्हा दुसऱ्या व्हिडिओस पाहण्याची शक्यता वाढते. जसे समजा, आपण एक विडिओ बनविला आहे जो गणिताचा बेरजेचा विडिओ आहे आणि समजा त्या व्हिडिओच्या End Screen ला तुम्ही बेरजेवरच अपूर्णांक संख्या बेरीज बेरजेवरील क्रिया या संबधी विडिओ बनविला आहे. आणि तो लावला तर तो विडिओ सुद्धा viewer कडून पाहण्याची शक्यता वाढेल.
End Screen कशी लावायची ?
मित्रांनो, जर End स्क्रीन ने View वाढणारच असतील तर ते आपण लावले पाहिजे असे तुम्हाला वाटतच असेल तेव्हा आपण ते कशा प्रकारे लावायचे पाहूया.
* सर्वात प्रथम तुमचा Youtube Desktop mode वर ओपन करा.
* आता चॅनेल Dashborad ओपन करा.
* Channel Dashborad open केल्यानंतर ज्या विडिओ ला End Screen लावायची आहे तो त्या व्हिडिओला Edit करा.
* Edit केल्यानंतर End Screen लावण्यासाठीचे Options तुम्हाला दिसतील त्यानुसार तुम्ही End Screen लावू शकता.
End Screen लावतांना एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि, व्हिडिओच्या अखेरीस जर महत्वाचा पॉईंट असेल तर तो एन्ड स्क्रीन मुळे दुर्लक्षित होऊ शकतो. हि एक गोष्ट सोडल्यास End Screen मुळे अनेक फायदे तुम्हाला होतील.
End स्क्रीन कशी लावायची यावर एक विडिओ आपल्या Youtube चॅनेल वर अपलोड आहे तो तुम्ही पाहून End screen लावू शकता.
धन्यवाद !
sai gedam ( marathi blogger / youtuber ) Visit Our Channel youtube.com/gadchirolikar
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box