Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

'Kantara' चित्रपट गाजतोय देशभर | नेमके 'कांतारा' म्हणजे काय?


'Kantara' चित्रपट गाजतोय देशभर | नेमके 'कांतारा' म्हणजे काय ?


सध्या 'Kantara' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आणि सगळीकडे या चित्रपटाला पसंती दिली जात आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होवून महिना होत असतानाही अद्याप हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या चित्रपटविषयक क्रेझ आणि कुतूहलता प्रेक्षक व चित्रपट रसिकांच्या मनात वाढतच आहे या सोबतच या चित्रपटाचे नाव ' कांतारा ' असे का आहे व त्याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न बहुतेकांना पडलेला आहे. याविषयीची माहिती आपण आज जाणून घेऊया.
Image Source : Instagram

Kantara म्हणजे काय ?


Kantara हा चित्रपट मूळ कन्नड भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.  कन्नड भाषेत जंगलाच्या रक्षणकर्त्या देवाला ' कांतारे ' म्हणतात. ' कांतारा' म्हणजे रहस्यमयी जंगल असे आहे. कर्नाटकातील भागात वन दैवताला खूप महत्व आहे. त्यांची वेशभूषा करून लोकनृत्य सादर करतात. अशाच प्रकारच्या कथानकातून रिषभ शेट्टी यांनी Kantara हा  चित्रपट बनविला आहे. आणि म्हणूनच त्यांनी चित्रपटाचे नाव ' कांतारा ' असे ठेवले आहे.

Kantara ट्रेलर 👇🏻



रोजच्या त्याच प्रकारच्या कथा आणि चित्रपटाला कंटाळलेल्या प्रेक्षकांना हा चित्रपट एका नव्या कथानक आणि एक वेगळीच अनुभूती देणारा ठरलेला दिसतो आहे. चित्रपटातील ऋषभ शेट्टी यांच्या आणि इतर कलाकारांच्या सुंदर अभिनय सोबतच या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपटात अडकवून ठेवण्यास यशस्वी होतो आहे.  निसर्ग आणि रक्षणकर्ता याविषयी या चित्रपटात मांडलेले कथानक खरच खूप अप्रतिम आहे. चित्रपटाच्या शेवटच्या १५ मिनिटाला प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातो. चित्रपट पाहताना अनुभवाल त्या भावना आपण व्यक्त करू शकत नाही. 


चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शन यासोबतच यामधे मुख्य अभिनेते सुध्दा रिषभ शेट्टी हेच आहेत. त्यांनी अगदी स्तुत्य असे अभिनय, दिग्दर्शन व लेखन केलेले आहे. हा चित्रपट आधी कन्नड भाषेत प्रदर्शित करण्यात आला त्यानंतर, चित्रपटाला मिळत असलेला प्रतसाद यामुळे या चित्रपटाला अनेक भाषेत डबिंग करण्यात आले. हिंदी भाषेत या चित्रपटाला १४ ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित करण्यात आले.

चित्रपटाचं बजेट २० कोटी रुपये होता तर, सध्या चित्रपटाने २०० कोटी इतकी आतापर्यंत कमाई केलेली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या