"नागोबा देव यात्रा" ही कोटगल या गावातील यात्रा गडचिरोली जिल्ह्यातील मोठी यात्रा.
गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्याल्यापासून पश्चिम दिशेस ७ किमी अंतरावर असणाऱ्या "कोटगल" या ५०० च्या वर आणि जवळपास ४५०० ते ५००० लोकसंख्या असलेल्या गावातील पश्चिम भागालगत "वैनगंगा" नदीलगत "नागोबा" हे कोटगल गावचे दैवत असलेले ठिकाण आहे. कोटगल गावात नागोबा देव या ठिकाणी भरणारी ही एकदिवसीय यात्रा भरते. गावापासून जिल्हा मुख्यालय, जिल्हा संकुल वसाहत, शासकीय निवासस्थान तथा आजूबाजूची अनेक गावांतील जनता या यात्रेनिमित्त कोटगल या ठिकाणी येत असे असतात.
गावाला लागून असलेली इंदाळा, विसापूर, कनेरी, पारडी यासारखी गावे त्याचप्रमाणे नागोबा देवस्थानाच्या लगत वाहणाऱ्या वैनगंगा नदी पल्याड गावांतील भाविक जण यात्रे प्रित्यर्थ येत असतात.
गावातली मंडळी व प्रशासन करतात भाविकांची सोय
अर्थातच मोठ्या प्रमाणात येणारी जनता यांची योग्य सोय व काळजी व्हावी करीता जिल्हा प्रशासन, पोलिस व गावातील युवक तथा गावातील स्थानिक मंडळे व गाव प्रशासन तर्फे भाविकांसाठी शांततापूर्ण व उत्साहात यात्रा पार पडण्यास सहकार्य करतात.
काय आहे येथील लोककथा ?
खूप वर्षापूर्वी एक व्यक्ती गुरे चारण्यासाठी कोटगल गावाच्या पश्चिमेस जात असायचा, दरम्यान त्याला त्याठिकाणी असलेल्या दगडावर बसून पावा वाजविण्याचा छंद होता. ही दैनंदिनी करतांना एक दिवस तो रोजच्या ठिकाणी बसून पावा वाजवित होता. सायंकाळ झाली गुरे परतली.
सोबत एक कुत्रं पण राहायचं. गुरे परतली, कुत्रं परतल पण तो मुल अजूनही का आले नाही या शोधात ग्रामवासी, घरचे मंडळी शोधाशोध करू लागली, दरम्यान दररोज सोबत असणारे कुत्रं मात्र एका ठिकाणी बसून वारंवार तिथेच बसत होता. तेव्हा ग्रामस्थ यांना कळले की, तेथे असणारा दगड हा काही प्रमाणात खाली गेला होता.
तेव्हा त्या ग्रामस्थ यांनी त्या ठिकाणाची पूजा करणे सुरू केली व ते आजतागायत सुरू आहे आणि त्यानंतर तो दिवसेंदिवस वाढत जात आहे स्थानिक पातळीवरील गावकरी व देवस्थानाच्या कार्यकारी मंडळी यांनी दिलेल्या माहितीनुसार कळते.
निसर्गरम्य देवस्थान सोबत पर्यटन स्थळ
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली नदी वैनगंगा. याच नदीच्या तीरावर वसलेले हे ठिकाण आहे. याच ठिकाणच्या पूर्वेस "कोटगल उपसा सिंचन प्रकल्प" आहे. सोबतच सध्या प्रगतीपथावर असलेल्या "कोटगल बॅरेज" मुळे येथील सौंदर्यात भर पडत आहे.
गावातली तरुणी, तरुण मंडळी, लहानगे पोरं व वयस्क असे सर्व या यात्रेकरिता येतात. अनेक जणांकडून या देवस्थानला नवस बोलले जाते.
एकाच वेळी होतात चार ते पाच नाटकं!
कोटगल ला भरणाऱ्या यात्रा या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील खास वैशिष्ट म्हणजे येथील लोककला "झाडीपट्टी रंगभूमी देसाईगंज वडसा" म्हणून प्रचलित व प्रसिद्ध असलेली नाटकं. गावात नागोबा देवा यात्रा निमित्त चार पाच नाटकं आयोजित केली जातात. आणि वैशिष्ट्य म्हणजे सर्वच नाटके गच्च भरलेली असतात. त्यामुळे दिवसेंदिवस या यात्रेची माहिती इतरही जिल्ह्यात पोहचू लागली व तिथूनही भाविक येतात.
गावातील स्थानिक मंडळे, युवक व रहिवासी जनता यांच्या प्रत्येक घरी पाहुण्यांची रेलचेल असते. गावातील प्रशासन व नागरिकांचे असे प्रयत्न असतात की, सर्व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची योग्य सोय व्हावी व कोणतीही अडचण येऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. गावात प्रत्येकांच्या घरी जेवण बनविले जाते. कोणालाही उपाशी ठेवले जात नाही. मुक्काम करायचा असल्यास तिही सुविधा घरोघरी असते. कोणत्याही पाहुण्यांना अडचण असल्यास ग्राम पंचायत, किंवा देवस्थान समितीस कळवावे असे आवाहन ग्राम पंचायत प्रशासन वतीने करण्यात येते.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box