Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Pavitra Portal Preference Started Soon | पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम आज होणार सुरु?

Pavitra Portal Preference Started Soon | पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम आज होणार सुरु?




पवित्र पोर्टल Preference लवकरच सुरु होत आहेत या संदर्भात सुचना देखील आज प्रसिद्ध होणार आहेत. नेमकी कशी असणार प्रोसेस आणि कशी असेल पुर्ण प्रकिया जाणुन घ्या.

पवित्र पोर्टल या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे राज्यातील शिक्षक भरती पार पडणार असुन त्यासंदर्भात अनेक दैनिक वर्तमापत्राद्वारे बातम्या येत आहेत. शिक्षक भरती साठी IBPS या कंपनीद्वारे TAIT परीक्षा देखील पार पडली असून शिक्षक भरतीसाठी ११६००० अभियोग्यताधारक प्रतिक्षेत आहेत.
 

२२,००० पदांसाठी होऊ शकते शिक्षक भरती


शासनाकडून वेळोवेळी ३०,००० जागा भरणार असल्याचे सांगण्यात येत होते. वित्त विभागाची शिक्षक भरतीकरीता ८० टक्के पदभरतीची परवानगी होती. भरती प्रक्रिया राबवितांना रोस्टर तपासण्यात आले त्यानुसार ज्या शाळांनी रोस्टर तपासून आपल्या जाहिराती अपलोड केल्या त्या ७० टक्के जागा ह्या टप्प्यात येणार असल्याचे कळते. शासनाने धोरणानुसार "साधन व्यक्ती" हे पद तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे भटक्या जमाती सारख्या प्रवर्गाच्या जागा कमी येत असल्याच्या प्रतिनिधींकडून आक्षेपानंतर १० टक्के जागा रिक्त ठेवण्यात आल्या, त्यामुळे एकंदरीत ७० टक्के जागा भरणार आहेत. 

२२,००० पदांची अशी असू शकते विभागणी



बिंदूनामावली व रोस्टर तपासून आलेल्या ७० टक्के जागा यामधे मुलाखत शिवाय व मुलाखत अशा प्रकारे जाहिराती प्रसिद्ध होणार असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद , महानगरपालिका यासोबत काही खाजगी संस्था ह्यांच्या जाहिरातीतील जागा विनामुलाखतिच्या असतील त्या जवळपास १६,००० व मुलाखतीला ६,००० अशा एकूण २२,००० जागेसाठी प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया आजपासून प्रारंभ होऊ शकते. त्या संदर्भात "पवित्र पोर्टल" वरील सूचना आज प्रसिद्ध होणार असून लगेच प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याकरिता पवित्र पोर्टल वर Bulletin हा Tab उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी या Tab च्या सूचनांचे पालन व प्रशासनाकडून वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या माहिती करीता उपयोगी पडणार असल्याचे राज्याच्या शिक्षण आयुक्त यांनी सांगितले.

पवित्र पोर्टल अधीकृत संकेतस्थळ 👉🏻  Click Here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या