महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, व खाजगी शिक्षण संस्था यातील शिक्षक पदभरती साठी घेण्यात आलेल्या टेट ( TAIT) परीक्षेचे निकाल प्रसिद्ध होऊन त्यातील गुणांनुसार शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
सर्व पात्र उमेवारांना पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्याची सुविधा दिनांक १४/२/२०२४ पर्यंत देण्यात आलेली होती. १ लाख ३६ हजार अभियोग्यता धारकांनी Preferences Lock केलेले आहेत. सध्या शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व अभियोग्यता धारकांना प्रतिक्षा आहे ती निवड यादीची.
लवकरच सर्वसाधारण निवड यादी
आयुक्त कार्यालय तर्फे सर्व अभियोग्यता धारकांना शिक्षक भरती संबंधी माहिती व सूचना उपलब्ध करून देण्यासाठी पवित्र पोर्टल वर Bulletin Tab सुरू केलेला आहे. त्यामधे आजच्या नविन आलेल्या माहितीनुसार कळते की, शिफारस पात्र निवड यादी तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि ही सर्वसाधारण निवड यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. परत तपासणी होवून यादी आजपासून केव्हाही प्रसिध्द होऊ शकते.
नियुक्ती कधी ?
२२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध पवित्र पोर्टल वरील सूचना पाहता सर्व अभियोग्यता धारकांना शिक्षक भरती करीता लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार व सध्या शासनाने आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रयत्न आहे.
![]() |
Pavitra Portal |
शिक्षक भरती प्रक्रिया व त्यांच्या घडामोडी अपडेट करीता पवित्र पोर्टल वरील News Bulletin Tab चा संदर्भ घ्यावा असे आवाहन राज्याचे आयुक्त सूरज मांढरे यांनी केलेले आहे.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box