Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

PM Vishwakarma विश्वकर्मा योजना संपूर्ण माहिती

PM VISHWAKARMA YOJANA SAMPURN MAHITI,  Pm vishwakarma yojana information in marathi

PM Vishwakarma  विश्वकर्मा योजना संपूर्ण माहिती 

नमस्कार,  शासनाने सध्या सुरु केलेल्या व संपूर्ण भारतात ऑनलाईन प्रक्रियाद्वारे सुरु असलेल्या पी एम विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती आपण या लेखात पाहूया. PM Vishwakarma काय आहे ? PM Vishwakarma या योजनेमध्ये कोण कोण अर्ज करू शकतो? PM Vishwakarma eligibility या सारख्या अनेक बाबी या लेखात आपण जाणून घेऊया. 

काय आहे PM Vishwakarma yojana ?

"PM विश्वकर्मा ही एक नवीन योजना आहे. पारंपारिक कारागीर आणि कारागीरांना त्यांच्या पारंपरिक उत्पादन आणि सेवांच्या वाढीसाठी शेवटपर्यंत सर्वसमावेशक समर्थन प्रदान करण्याची योजना आहे." १५ ऑगस्ट २०२३ रोजी मा. पंतप्रधान यांनी लाल किल्ल्यावरून या योजनेचे उदघाटन केले. भारतातील सर्वात महत्वाच्या योजनेपैकी हि एक योजना आहे. भारतातील अनेक प्रकारच्या कौशल्यपूर्ण कामे करणाऱ्या १८ कामाच्या कामगाराकरिता या जोजनेच्या माध्यमातून मदत किंवा लाभ मिळणार आहे. 

Pm Vishwakarma scheme हि केंद्राच्या लघु आणि मध्यम विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली Scheme जी पारंपारिक कामे करणाऱ्या कारागिरांना कौशल्य व मदत पुरविण्याकरिता सुरु करण्यात आलेली आहे. 

Pm Vishwakarma scheme २०२३ करीत पात्रता काय ? कोण कोण लाभ घेऊ शकता ?

लाकूड व्यवसायावर आधारित - सुतार, बोट बनविणारे इ. 

लोह/दगड/धातूवर आधारित वय व्यावसायिक - आर्मर, लोहार, हॅमर आणि टूल किट मेकर, लॉकस्मिथ, शिल्पकार ( मूर्तिकार, दगडी कोरीव काम करणारे ) दगड तोडणारे, अवजारे बनविणारे. 

सोने/चांदीवर आधारित - सोनार , सुवर्णकार 

कुंभार, मोची, पादत्राणे बनविणारे, न्हावी, माली, मच्छीमार, धोबी, शिंपी,बडीगर, बग्गा, विधान, भारद्वाज, पांचाळ,खेळणी बनविणारे, गवंडी, कुलूप बनविणारे, विणकर इ असंघटित कारागिरांना पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे. 

Pm Vishwakarma scheme अंतर्गत मिळणारे फायदे 

१. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना १५,०००/- रुपये किमतीचे साहित्ये केंद्र शासनाकडून प्रोत्साहन म्हणून दिले जाईल. 

२. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊन पैसे मिळाल्यास पारंपरिक कारागीर आणि शिल्पकार यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सहकार्य होईल.

३. पीएम विश्वकर्मा लाभार्थीना ओळख म्हणून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल. 

४. पाच दिवशीय पायाभूत प्रशिक्षण व पंधरा दिवसिय पूर्ण प्रशिक्षण कालावधीत ५००/- रुपये ( रोज ) लाभार्थ्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे. 

५. पहिल्या टप्प्यात १ लाख पर्यंत दुसऱ्या टप्यात २ लाखाची मदत ५% व्याजदराने दिली जाईल. 

Pm Vishwakarma scheme documents 

वोटर आयडी कार्ड 

आधार कार्ड ( With Mobile Number Link )

बँक अकाउंट ( राष्ट्रीयकृत )

Income Certificate 

Caste Certificate 


Pm Vishwakarma scheme Minimun Age 

१८ वर्ष

पी एम विश्वकर्मा योजना फॉर्म Online कसा व कोठे भरायचा ?

Pm Vishwakarma scheme फॉर्म भरण्यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या CSC केंद्र या ठिकाणी जाऊन भरू शकता. पी एम विश्वकर्मा फॉर्म भरतांना संपूर्ण नाव, पत्ता, तुमच्या शिधापपत्रिकेत समाविष्ट नावे व त्यांचे आधार नंबर. तुमचे बँक अकाउंट नंबर, ifsc code, branch code व तुम्ही ज्या कौशल्याधारित कामावर या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित आहात तो काम तिथे टाकावा अशा प्रकारे तुम्ही या योजनेत ऑनलाईन आवेदन करून लाभ घेऊ शकता. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या