Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Free Blog मधून खरोखर पैसे येतात का ? पण कसे येतात ?

Free Blog मधून खरोखर पैसे येतात का ?

"मी आपल्या Free Bogger वरून Google Adsense ने पैसे कामवितो आहे. त्यामुळे सर्व ब्लॉगिंग मधून पैसे कमवू किंवा ब्लॉगिंग शिकू पाहणाऱ्या युवक, युवतींसाठी हा लेख खरोखर उपयुक्त ठरेल . "

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी एक छोट्याशा गावात राहणारा एक ब्लॉगर आहे. आता तुम्ही जो ब्लॉग वाचत आहात तो लिहिण्यासाठी मला प्रेरणा किंवा आवश्यकता वाटली ती नवीन तरुण - तरुणी यांच्या करीता. जे नवागत तरुण मंडळी ब्लॉगिंग करू इच्छितात पण, त्यांना योग्य माहिती नसल्या कारणाने किंवा योग्य माहिती न मिळाल्याने ते घाईघाईत ब्लॉगिंग सुरु करतात आणि मग नैराश्यात जातात किंवा या उलट काही जण उगाच घाबरून जातात व त्यांच्यात क्षमता, आवड असूनही सुरुवात देखील करत नाहीत.
याच समस्या आणि प्रश्नांना अनुसरून मी आजचा हा ब्लॉग लिहितो आहे. आशा आहे नक्कीच यातून तुम्हाला blogging विषयी जाणायला मदत होईल आणि प्रेरणा मिळेल. तत्पूर्वी तूम्ही ब्लॉगिंग करू इच्छीत असाल तर हा ब्लॉग संपुर्ण वाचणार यात तिळमात्र शंका नाही. मात्र एक जणकल्याणाचे काम करू शकता, तुम्ही हे ब्लॉग अशा मित्रांना पाठवा किंवा सांगा ज्यांना ब्लॉगिंग सुरु करायची आहे अथवा यात आवड आहे. चला तर मग पॉईंट टू पॉईंट आपण सर्व समजून घेऊ

Blogging म्हणजे काय ?


मित्रांनो, Blogging म्हणजे काय हा प्रश्न सर्वात आधी समजून घेणे खरच गरजेचे आहे. खरं तर या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर देताच येत नाही. आणि थोडक्यात सांगायचे झाल्यास "Blogging म्हणजे, आपले विचार, आपल्या कल्पना किंवा आपल्याकडील माहिती डिजिटल स्वरूपात वेबसाईट अथवा ब्लॉग पेज बनवून ती जगासमोर मांडणे प्रकाशित करणे." Blogging विषयी सविस्तर माहिती आम्ही या पूर्वी आपल्या ब्लॉग पेज ला प्रकाशित केलेली आहे. खालील लिंक वरून ती तुम्ही सविस्तर वाचू शकतात. तूर्तास आपण पुढील माहिती जाणून घेऊ.

Blogging मधून पैसे येतात काय ?


बहूतेक जण Blog सुरू करताना सर्वात आधी हाच विचार मनात ठेवतो की मला ब्लॉगिंग मधून पैसे कसे येतील किंवा ब्लॉगिंग मधून मी खूप पैसे कमवेन. बहुतेकांना Doubt पण असतो की, Blogging मधून खरोखर पैसे येतात काय ? खरं तर ब्लॉगिंग हे आर्थिक बाबींशी निगडित आहे त्यामुळे पैसे येणार हे १०० टक्के खरे आहे. आणि मी ब्लॉगिंग मधून पैसे सध्या तरी कमवितो आहे. मीच नाही तर माझ्यासारखे कित्येक लोकं आज ब्लॉगिंग च्या माध्यमातुन चांगला आर्थिक लाभ घेत आहेत. 

पण याठिकाणी मला एक ब्लॉगर म्हणून या विषयावर तुम्हाला सांगावे वाटते की, तुम्ही जर केवळ आणि केवळ पैसे कमवायचे म्हणून ब्लॉग बनवायचे हे चित्र मनात धरून असाल तर खूप कठीण आहे. 

आपण कोणतेही काम करतो त्याला त्याचा मोबदला मिळावा हे सर्वांनाच वाटत असते पण त्याला लागणारी साजेशी मेहनत करायला सर्वच तयार असतात असे मुळात नसते. ब्लॉग सुरु केले म्हणजे पैसे यायला सुरुवात असे नसते. त्यासाठी आधी हि प्रक्रिया नेमकी कशी असते हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. 

ब्लॉगिंग मधून पैसे येतात काय ? या प्रश्नाच एका वाक्यात उत्तर द्यायचे झाल्यास उत्तर असणार आहे होय. 

ब्लॉग किंवा ब्लॉगिंग ने पैसे कसे येतात ?


Blog सुरु करण्याआधी मला या विषयी प्रचंड कुतूहल होते. आणि एक प्रश्नही पडत होता कि, नेमके कशाप्रकारे येत असतील. मी ब्लॉगिंग शिकतांना अनेक जणांचे ब्लॉग्स वाचले आहेत. अनेक Website उघडून त्यात तासंतास केवळ हेच पाहत असायचो कि, यांच्यात नेमके काय आहे ? ब्लॉगची रचना कशी आहे ? ब्लॉग कधी सुरु केला ? अशा विविध प्रकारच्या माहिती मी अनेक वेबसाईट्स व ब्लॉग मध्ये शोधत आपला ब्लॉग सुरु केला. 

आपण पाहतो आहोत कि, ब्लॉग मधून पैसे कसे येतात. तर या विषयी खाली अनेक पॉईंट्स आहेत ज्या द्वारे पैसे येतात. यातील एका एका पॉईंट्स वर सविस्तर माहिती पाहू. 

१. AdSense 


मित्रांनो, सर्वात मोठा आणि महत्वाचा जो ब्लॉगिंग मध्ये कमाईचा माध्यम आहे तो म्हणजे ऍडसेन्स. आता AdSense  म्हणजे काय ? तर आपणं आता जो लेख किंवा ब्लॉग वाचत आहात तेव्हा तुम्हाला काही जाहिराती दिसत असतील त्या जाहिराती म्हणजेच AdSese लावलेल्या जाहिराती आहेत. त्या जाहिराती तुमच्यापर्यंत माझ्या ह्या लेखातून दाखविल्या जात आहेत त्यामुळे त्याचा मोबदला मला दिला जाईल. आणि हीच कमाई म्हणजे आपल्या ब्लॉग ची ऍडसेन्स ची कमाई आहे. 

आता ऍडसेन्स कसे लावले जाते ? तर ऍडसेन्स साठी आपल्याला अनेक मार्ग असतात. म्हणजेच ऍडसेन्स किंवा ads दाखविणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची आणि सर्वांना आवडीची एक कंपनी म्हणजे Google ची Adsense कंपनी. सर्व ब्लॉगर मित्रांना सर्वात जास्त वेड व सर्वात हवी हवी वाटणारी Google AdSense चे Approval. अगदी सोप्या पद्धतीने आपण Google चे AdSense Approval मिळवू शकतो. याबद्दल मी एक लेख प्रकाशित केला आहे तो तुम्ही वाचू शकता. 

How to Get Google AdSense Approval Fast In Marathi


2. Paid Post व जाहिराती 


paid post म्हणजे तुम्ही तुमच्या ब्लॉग वर आर्टिकल लिहून पैसे कमवू शकता. समजा एखादी कंपनी आहे किंवा एखादा व्यावसायिक आहे ज्याला वाटतो कि तुमच्या ब्लॉगवर त्याच्या व्यवसायाबद्दल जाहिरात द्यावी तर ते तुम्ही देऊ शकता व द्या बदल्यात तुम्ही त्या कंपनी अथवा व्यावसायिकाकडून फी आकारू शकता. आज अनेक अशी दुकाने आहेत ज्यांना आपल्या मालाची किंवा सेवेची माहिती इंटरनेट वर प्रकशित करून ते अनेकांपर्यंत पोहचावी वाटते तेव्हा ते तुमची मदत घेऊ शकतात. एखाद्याला आपली कविता जगासमोर मांडावी वाटते ती कविता तुम्ही आपल्या ब्लॉग वर नेऊ शकता. अनेक कोचिंग क्लास आहेत ज्यांना नेहमीच जाहिरातीची आवश्यकता असते त्याच्या जाहिराती तुम्ही लावून त्याचा कडून मोबदला कमवू शकता. 


३. Affeliate Marketing 


Affeliate Marketing हा संबोध आजही अनेकांना समजत नाही. पण हा एक असा मार्ग व पर्याय ठरू शकतो जिथे आपल्याला एकही रुपया न गुंतवता कमाईचे दालन उघडे करू शकतो. Affeliate Marketing मध्ये आपल्याला एखाद्याची सेवा दुसऱ्या खरेदीदारपर्यंत न्यायची असते त्या बदल्यात आपल्याला काही टक्के नफा मिळतो. जसे कि, आपण Amazon या ऑनलाईन खरेदी केल्या जाणाऱ्या साईट ला ऐकूनच आहात या ठिकाणच्या अनेक चांगल्या वस्तू आपण लोकांना खरेदी करण्यास सांगू शकतो Amazon कडून या बदल्यात चांगला टक्क्यांनी नफा दिला जातो. आणि त्या वस्तू आपण आपल्या ब्लॉग वर छान माहिती लिहून त्याचे मार्केटिंग करू शकतो. 

असे अनेक असंख्य पर्याय आहेत ज्यातून आपण आपल्या ब्लॉग मधून कमाई करू शकतो. फक्त त्यासाठी आधी आवड असणे आणि माहिती घेण्याची आणि पेशन्स ठेवण्याची तयारी आवश्यक आहे. 

आपल्याला Affeliate Marketing  बद्दल जाणून घायचे असल्यास खालील माहिती नक्की वाचा. 

Clik Here to read Affeliate Marketing








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या