Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Is Safe To Work In Gadchiroli ? Google वर अनेकदा Search केला जाणारा प्रश्न; घ्या जाणून एका गडचिरोलीकराकडून

मित्रांनो आपणांस माहीतच आहे की, मी मराठी भाषेत लिहीत असतो. नुकताच Google ने आपल्या ब्लॉगवर Ideas feature दिलेला आहे त्यामधे तो आपल्याला आपल्या ब्लॉगवर असलेल्या माहितीशी निगडित विषयावर लीहिण्याबाबत ideas देत असतो. मी Online Earning कशी करावी?, सामाजिक माध्यम, योजना, Government Bharati संबंधी जाहिराती सोबतच महाराष्ट्रातील जिल्ह्याची माहिती सुध्दा share करत असतो त्यामुळेच Google ने दखल घेत हे बघ तुझ्या गडचिरोली जिल्ह्यावर Google Search मध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न यावर Article लिही. आणि लिहिण्यास Suggest केले आहे की, it is safe to work in Gadchiroli.  यावर माझा मत याठिकाणी देत आहे. आणि मी गडचिरोली जिल्ह्यातीलच आहे. आधीच सांगितले की, मी मराठीत लिहितो आणि Google ने प्रश्न इंग्रजीत Suggest केले आहे तेव्हा तुम्ही इंग्रजी भाषेत translate करून वाचू शकता. कारण आधीच मला इंग्रजी येत नाही आणि मराठीत मी माझ्या मनातले चांगल्याप्रकारे लिहू किंवा बोलू शकतो. 



प्रश्न कसा पडला ?

तुम्ही जेव्हा हा प्रश्न Google वर Search मारता की, it is safe to work in Gadchiroli तेव्हा सर्वात आधी मी आपणास विचारतो की, हा प्रश्न का बर तुम्ही Google ला विचारता? कारण तुम्हाला वाटत असेल ना की, कोणीतरी यावर लिहिले असेल की, गडचिरोली मध्ये काम करणे safe आहे की unsafe आणि मग ते लिहिलेले Google मार्फत तुम्हाला वाचायला दाखविले जाईल. तर याचं एका वाक्यात साधा सरळ उत्तर आहे is very safe to work in Gadchiroli. होय गडचिरोली मध्ये कोणत्याही ठिकाणी काम करणे एकदम सेफ आहे. 
    1. जिथे खरी माणुसकी नांदते तिथे Unsafe काय असणार ?
    गडचिरोली जिल्ह्यात तुम्ही कोणत्याही ठिकाणी फिरायला जा तेथील स्थानिक लोकांना तुमच्या आगमनाचा नेहमीच आनंद असतो. तुम्हाला क्षणभर सुद्धा बाहेर असल्याचा भास होणार नाही असे वाटेल कि, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबतच आहात. तुम्ही कोणत्याही गावात थांबा, तुम्ही उपाशी मरणार नाही. कोणीच एकटे सोडणार नाही तुम्हाला विचारतील तुमची काळजी घेतील. तुम्हाला एखाद्या मित्राच्या घरी जायचे असेल आणि त्याचे घर तुम्हाला माहिती नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका कारण, गावाच्या कोणत्याही टोकावर जाऊन किंवा गावाच्या जवळ इतर गावातही जरी हव्या असलेला पत्ता विचारा तुम्हाला तो पत्ता काय तर प्रत्यक्ष घरापर्यंत सोडून देण्यात येईल इतकी सोय आहे. ज्या सोयीचा Google Map ला सुद्धा हेवा वाटावा. 

    2. एका भेटीत जीव भरणार नाही 

    माझ्या भारतातील व महाराष्ट्रातील मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर एकदा का गडचिरोली जिल्ह्यात आले तर खूप शक्यता आहे, कि पुन्हा तुम्ही परत गडचिरोली जिल्ह्यात येण्यासाठी तयार व्हाल. इथली संस्कृती, निसर्ग पाहून तुम्ही थक्क व्हाल, तुम्हाला अशा काही नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील ज्या तुमच्यासाठी अभूतपूर्व असतील. मी बहुतेक लोकांना असे म्हणतांना ऐकले आहे कि, संपूर्ण महाराष्ट्रात खूप सौन्दर्यपूर्ण असा गडचिरोली जिल्हा आहे. आणि त्यांनी परत पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात फिरायला येण्याची इच्छा प्रकट केली. 


    3. विविधतेने नटलेला गडचिरोली जिल्हा 

    आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. कश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत अनेक बाबतीत विविधता आपणास आढळून येईल त्याचप्रकारे गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा तुम्हाला विविधता आढळून येईल जणू संपूर्ण भारताची झलकच गडचिरोली जिल्ह्यात पाहायला मिळेल. अनेक प्रकारच्या भाषा या जिल्ह्यात बोलल्या जातात.  मराठी हि सर्वत्र बोलली जाणारी भाषा तर आहेच यासोबत इंग्रजी आणि हिंदी या जिल्ह्यात बोलली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्याच्या आणि छत्तीसगढ राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भागात छत्तीसगडी भाषा बोलली जाते. तुम्ही गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जात तेव्हा तुम्हाला तेलगू भाषा ऐकायला मिळेल. या भागातील गावाची नावे सुद्धा आंध्राकडील गावे असल्यागत वाटतील असे वाटेल कि, आपण आंध्रप्रदेश किंवा तेलंगाना राज्यात गेलो. चामोर्शी, मुलचेरा मध्ये बंगाली भाषिक बांधव आहेत. भामरागड येथील निसर्गरम्य भागात बडा माडिया हि आदिम जमात वास्तव्यास आहे. गडचिरोली जिल्ह्यात गोंडी व माडिया हि भाषा सुद्धा बोलली जाते. सध्या गोंडी व माडिया भाषेतून शिक्षण देण्याचे नवनवीन प्रयोग सुद्धा गडचिरोली जिल्ह्यात राबविले जात आहे. 
    4. पृथ्वीवरील स्वर्ग पाहायचे आहे ?  गडचिरोली जिल्ह्यात नक्की या.

    गडचिरोली जिल्ह्यात असे ठिकाणे आहेत ज्या तुमच्या आयुष्यातील अविस्विमरणीय ठरतील. तुम्ही कधी समुद्रसपाटीपासून उंचच उंच असलेल्या ठिकाणी पाणी असलेला ठिकाण पहिले आहे का ? वाचून आश्चर्य वाटले ना. गडचिरोली जिल्ह्यात Tipagad टिपागड ' एक असे ठिकाण आहे ज्याठिकाणी पर्वतावर तलाव आहे आणि या ठिकाणी वर्षभर पाणी असतो महाराष्ट्रातील हे असे ठिकाण आहे. ज्याठिकाणी उंच पहाडावर नैसर्गिक तलाव आहे. हत्ती पाहायला तुम्ही कर्नाटक सारख्या ठिकाणी जायचा बेत असेल तर, एकदा गडचिरोली जिल्ह्यातील ' कमलापूर ' या ठिकाणाला भेट द्यावी कारण तुमची हत्ती पाहण्याची इच्छा याठिकाणी पूर्ण होईल. महाराष्ट्रातील हत्ती  असलेले एकमेव ठिकाण कमलापूर सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातीलच आहे. खजुराओ प्रकारचे मार्कंडा येथील शिवमंदिर प्रेक्षणीय आहेत. तेथील दगडावरील सुंदर कलाकृती पाहून एखाद्या कवीला कविता नक्कीच सुचेल, हे ठिकाण विदर्भाची कशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वैनगंगा नदी हि दक्षिण वाहिनी असून या ठिकाणी उत्तरवाहिनी झालेली आपण पाहू शकता. गडचिरोली जिल्ह्यात असे बरेचसे ठिकाणे आहेत जी, नाविन्यपूर्ण व एकमेव वाटतात. 
    गडचिरोली जिल्ह्यात Dianasour चे अवशेष

    असलेले ठिकाण सुद्धा सिरोंचा तालुक्यातील ' वडधम ' या ठिकाणी नुकतेच पाहायला मिळाले. म्हणजेच खऱ्या खुऱ्या जुरासिक पार्क पाहण्याचे स्वप्न सुद्धा गडचिरोली जिल्ह्यात साकार होतील. छत्तीसगड राज्याचा राज्यप्राणी गडचिरोली जिल्ह्यात आढळतो. सिरोंचा वनविभागातील ' कोलामर्का ' हे छत्तीसगड राज्याच्या राज्यप्राणी असलेल्या रानम्हैस या प्राण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रथमच राखीव क्षेत्र आहे आणि रानम्हैस असणारे हे राज्यातील पहिले राखीव क्षेत्र आहे जे इंद्रावती नदीच्या खोऱ्यात येते. 

    5. निसर्गसंपन्न गडचिरोली जिल्हा

    महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगलक्षेत्र असलेला जिल्हा हा गडचिरोली जिल्हा असून जिल्ह्यातील एकूण भौगोलिक  क्षेत्रापैकी जवळपास ७० टक्के क्षेत्र जांगलव्याप्त आहे. त्यामुळे येथील वातावरण एकदम शुद्ध आणि आरोग्यसंपन्न आहे. गर्द दाट, झुडपी, काटेरी, गवती अशा प्रकारची अनेक वनस्पती आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात आहेत. महाराष्ट्रात Glory Of Allapalli हा गडचिरोली जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्र आहे. या ठिकाणी जगप्रसिद्ध सागाची झाडे आहेत. 
    गडचिरोली जिल्ह्यात जीव गुंतला नाही असा कोण नाही 

    " किती सांगू गडचिरोली जिल्ह्याची कौतुके परी स्वर्गाशीही पैजा जिंके " काही जण बदल्या होऊन गडचिरोली जिल्ह्यात येतात. काही वेळेस त्यांना वाटते कि, गडचिरोली जिल्हा हा मागास आहे, आपल्याला तिथे करमेल का ? सोइ सुविधा मिळतील का ? पण जेव्हा ते गडचिरोली जिल्ह्यात येतात फार जास्त नाही काही अल्पकाळात ते गडचिरोली जिल्ह्यात इतके रमून जातात कि, त्यांना परत इथेच बदली मिळावी किंवा आपण इथेच कायम राहावे असे म्हणणारे सुद्धा भरपूर जण  आहेत. काही Hightech सुविधा नसतील पण माणसाला हव्या असलेल्या गोष्टी इथे मिळतातच. मग शिक्षण असो, कि आरोग्य आज शिक्षणाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा हा आपली वेगळी ओळख निर्माण करतो आहे. अनेक शाळेच्या शिक्षकांनी आपल्या जिल्ह्याचे, अनेक शाळांनी आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे. आरोग्य सुविधाही चांगल्या दर्जाच्या होऊ घातल्या आहेत. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प व डॉ. अभय बंग यांच्या चातगाव येथील सर्च सारख्या समाजसेवी संस्थांनी आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा स्तुत्य उपक्रम राबवित जिल्ह्यातील बांधवांचे आरोग्य राखण्याचा कार्य सुरळीत सुरु आहे.  जिल्ह्यातील औषधी वनस्पती च्या मुबलक प्रमाणाने व पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीने अनेक आजारांवर जिल्ह्यात उपचार केले जाते आणि हा उपचार करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात लोक येत असतात. 

    आपल्या पत्नीचा औषोधोपचार व आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपला बदली अर्जाला स्थगिती मागितलेला एक कर्मचारी मला जेव्हा हा प्रसंग सांगत होता तेव्हा मला आपल्या गडचिरोलीविषयी आणखीनच अभिमान वाटलं आणि अभिमान आहे. 

    तुम्ही केव्हाही या गडचिरोली जिल्ह्यात आपले नेहमी स्वागत आहे. आणि  Gadchiroli Is Safe To Work 


    Gadchirolikar ( आमच्या Youtube Channel  ला भेट द्या ) 




    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या