Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Blog लिहायचंय ? मग Google AdSense चे Approval मिळणार का ? , Marathi Bloggers जाणून घ्या Marathi Blogging Tips

Marathi Blog लिहायचंय ? मग Google AdSense चे Approval मिळणार का ? Marathi Blogging Tips


राठी भाषेतून ब्लॉग लिहिल्यास  Google AdSense चे Approval मिळते का ? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. आणि जर आपण मराठी भाषेत ब्लॉग लिहायला सुरुवात केलो तर नेमक्या कोणत्या अडचणी येतात. आणि किती दिवसात आपल्याला गूगल ऍडसेन्स चे अप्रूव्हल मिळू शकते. नेमके मिळणार कि नाही ? आणि त्याला कोणत्या योजना आखाव्या लागतील आणि पुढे भविष्य काय ? या सर्व गोष्टीवर आपण या लेखात जाणून घेऊया. 

Image : Pixel.com 

मराठी ब्लॉगर्स आणि मराठी ब्लॉग Marathi Blogging Tips

Blogging क्षेत्रात येऊन पैसे कमवू पाहणाऱ्या किंवा Blogging ने आपल्या कल्पक Ideas Share करू पाहणाऱ्या नवीन युवक मंडळींना हा प्रश्न नक्कीच भेडसावत असेल की, आपण नेमके कोणत्या भाषेत blogs लिहायला पाहिजे ? आपण नेहमी Google वर Search करतांना जास्तीत जास्त English मध्येच Type करतो. आणि साहजिकच Google द्वारे Result सुध्दा इंग्लिश मध्येच येतील. पण काही वेळेस आपल्याला हिंदी मधे सुध्दा Blogs पाहायला मिळतात. ज्या English मध्ये Search करतांना सुध्दा दाखविल्या जातात. मग आपल्याला वाटते की, जर English किंवा हिंदी मधीलच ब्लॉग किंवा Post Google वर Rank करत असतील तर आपण का मराठीत लिहितो. आणि ह्यातच आपण आपल्या भाषेतून न लिहिता English मध्येच लीहिण्याकडे वळतो. पण, आपण फार जास्त काळ English मध्ये लिहू शकत नाही. ठराविक काळानंतर आपल्याला अडचण निर्माण होते. याला अपवाद म्हणा किंवा ज्यांना English बऱ्याच प्रमाणात जमते ते जास्त काळ लिहू शकतात पण ज्यांना पुढे अडचण जाते ते मध्येच सोडून देतात. त्यामुळे त्यांचे Blogging क्षेत्रातील कारकीर्द संपुष्टात येते. पण, तेच जर त्यांनी आपल्या भाषेत लिहिले असते तर फार जास्त काळ, जास्त शब्दात व अधिक प्रभावी पद्धतीने लिहिले असते. पण त्याआधी त्यांना भीती असते की, मराठी Blogs कोण वाचणार? आणि Google वर Rank होणार का? ह्या प्रश्नांनी ते माघार घेतात. 

You Tube ने पैसे कसे कमवा २ तास काम करून

हे आपण मान्य करतो की, English ही अंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त चालणारी भाषा आहे. Google वर सुध्दा बहुतेक First Page वर Rank करणारे आर्टिकल हे इंग्रजी भाषेत आहेत. पण प्रत्येकच जण English भाषेत वाचतो असेही नाही. 


सुरुवातीला हिंदी भाषेतील सुध्दा Articles कमी होते. त्यानंतर बहुतेक जणांनी आपल्या ब्लॉग वर हिंदी भाषेत माहिती लिहून आपली वेबसाईट Google मध्ये Rank केली असे भरपूर उदाहरणे देता येतील. त्यानंतर हिंदी मधे ब्लॉग्ज लिहिण्याची ओढच निर्माण झाली आणि बऱ्याच जणांनी English मध्ये असलेला Content आपल्या हिंदी भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ज्यांना लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि ते आज Blogging क्षेत्रात नावलौकिक मिळवून चांगले पैसे सुध्दा कमवीत आहेत.

मराठी भाषेत Blogs लिहू शकतो का ?

याचे सरळ उत्तर आहे, होय ? आपण मराठी भाषेत Articles लिहून आपला Marathi Blog बनवू शकतो. Blogger मध्ये तुम्ही जर Languages निवडाल तर १४० च्या वर भाषेत Articles लिहिण्याचे Options तुम्हाला दिसतील. आता जेव्हा Google ने स्वतः मराठी भाषा त्यांच्या Language Settings मध्ये मराठी भाषेला स्थान दिले आहे. तर Obviously आपण मराठीतून Article लिहू शकतो. आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या मातृभाषेतून आपण जास्त प्रभावीपणे एखादा विषय समजावून सांगू शकतो. एखाद्या दुसऱ्या भाषेत लिहितांना त्या भाषेतील काही अपुऱ्या शब्द संपत्ती मुळे आपले विचार आपण व्यवस्थित प्रकट करू शकत नाही याउलट आपल्या मातृभाषेतील शब्दसाठ्याने जास्त प्रभावी व मुद्देसूद पणे आपण Article लिहू शकतो असे मला वाटते. 


Marathi Blog Google Rank होणार का?

Google Rank होण्याविषयी याआधी आपण पाहिलो की, जास्तीत जास्त English Articles किंवा Blog Ranking मध्ये असतात. ते असणारच पण आता तुम्ही पाहत असाल की, मराठी Articles सुध्दा बऱ्यापैकी Google Ranking मध्ये आहेत. आणि असे बरेच जण असतात ज्यांना English भाषेतील Articles वाचण्यास आणि समजून घेण्यास अडचण होते. किंवा अजिबातच समजत नाहीत अशा लोकांकडून ती माहिती मराठीत मिळेल या हेतूने Google वर Search केले जाते. पण नाईलाजने ते Articles किंवा Search केलेल्या विषयासंबंधी माहिती Google मध्ये उपलब्ध नसण्याने त्यांना दुसऱ्या भाषेतील Articles वाचावे लागते. तीच माहिती त्यांना आपण जर आपल्या मराठी भाषेत उपलब्ध करून दिली तर ? आणि Google ला सुध्दा हवे आहे की, नवनवीन माहिती लोकल भाषेत Google वर यावी. 


Marathi Languages Blog ला Google AdSense Approval मिळणार का ?

हा प्रश्न ज्यावेळेस मी ब्लॉगिंग ची सुरुवात केली त्याच वेळी मला पडला होता. अनेक वेळा विचार केला कि, आपण English मध्ये Blog लिहावे. पण English मध्ये ब्लॉग लिहिण्यासाठी जी शब्दसंपत्ती लागेल ती  सध्या तरी आपल्याजवळ नाहीच त्यामुळे आपल्याला काय लिहायचं आहे. ते परखडपणे व स्पष्टपणे मांडता येणार नाही. मग काही वेळेला हिंदी मध्ये लिहावे याचा सुद्धा विचार केला पण, शेवटी मराठी मध्ये जितक्या प्रभावी मी आपल्या भावना किंवा गोष्टी सांगू शकतो ते हिंदीतही सांगू शकलो नसतो. म्हणून मी Marathi Blog म्हणजेच मराठी मधेच ब्लॉग लिहिणे सुरु केले. 

Google AdSense Tips In Marathi

त्यापूर्वी मला google वर सर्च केल्यानंतर असे अनेक topics होते ज्या मराठी भाषेतील होते. त्यामुळे त्यांचे Articles Rank झाले तर मग आपले पण होणार हा विचार डोक्यात आला. आणि काही वेळेस Google सर्च केलेली माहिती मराठी भाषेत अजिबात उपलब्ध नव्हती सोबत काही माहिती तर अजिबातच येत नव्हती तेव्हा आपण मराठी मध्ये लिहावे हा निर्णय घेतला. आणि आज आपला ब्लॉग Google AdSense ने Approval आहे. त्यामुळे Marathi Blog ला Google AdSense चे Approval नक्कीच मिळते

Marathi Blogs कोण वाचतो ? Future Of Marathi Blog 

जेव्हा आपण मराठी भाषेत ब्लॉग लिहायला सुरुवात करतो त्यावेळी कोणीच वाचक आलेला नसतो  मग तुम्ही ते English , हिंदी किंवा कोणत्याही भाषेत लिहा. ज्याप्रमाणे एका इंग्रजी मध्ये ब्लॉग लिहिणाऱ्या ब्लॉगर ला आपल्या ब्लॉग वर वाचक आणण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात त्या तुम्हाला देखील कराव्या लागतील काही ठराविक काळानंतर तुमच्या ब्लॉग वर वाचक येतील आणि त्यांना जर तुमचे ब्लॉग आवडले तर तो वाचक पुन्हा तुमच्या ब्लॉग वर दुसरे नवीन ब्लॉग वाचण्याकरिता येत राहील आणि प्रक्रिया कोणत्याही भाषेत ब्लॉग लिहिणाऱ्या ब्लॉगर ला करावे लागते. 

आज प्रत्येक विषयावर इंग्रजी भाषेत तुम्हाला ब्लॉग आढळून येतील पण प्रत्येकालाच इंग्रजी ब्लॉग वाचून समजत असतील असे आपण गृहीत धरू शकत नाही. असे अनेक विषय आहेत ज्यात मराठा ब्लॉग क्वचितच दिसतात आणि काही ब्लॉग मध्ये आपल्याला हवी असलेली परिपूर्ण माहिती मिळत नाही. 

सोबतच इंग्रजी मध्ये आधीच बहुतेकांनी ब्लॉग लिहून ठेवले असल्याने त्यात खूप Competition असणार आहे म्हणजेच आपल्याला इंग्रजी मध्ये खूप Competition करावे लागेल याउलट मराठी मध्ये कमी ब्लॉग्स किंवा ब्लॉगर्स असल्याने हि Competition  कमी असेल आणि आपल्याला रँक होण्याचे जास्त प्रमाणात चान्स राहतील. सध्या मराठी ब्लॉग्स आणि ब्लॉगर्स ची संख्या कमी आहे. पुढे जाऊन हि संख्या नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे आत्ताच आपण आपला मराठी मधील ब्लॉग्स सुरु करून Google वर रँक किंवा जास्तीत जास्त वाचकापर्यंत आपला ब्लॉग नेऊ शकतो. 

Marathi Blog वर जागतिक वाचक कसे येतील ?

जगात अनेक विषय आहेत ज्या विषयावर दररोज Google सारख्या सर्च इंजिन वर सर्च केले जाते. त्यामध्ये विदेशातून विदेशातून म्हणा किंवा जगभरातून कुठेही काहीही सर्च केले जाते. समजा मी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. मला माहिती आहे आमच्या जिल्ह्यात कुठे काय आहे संपूर्णतः नसेल माहिती पण काही गोष्टी  अशा आहेत ज्या खरच आपण जगाला छातीठोक पणे सांगू शकतो कि, त्या फक्त आपल्याच जिल्ह्यात आहेत. त्या सर्व गोष्टी आपण एका ब्लॉग च्या माध्यमातून आपल्याच भाषेत share केल्या आणि एखादा विदेशी माणूस ज्याला गडचिरोली जिह्यातील जी माहिती त्याने google ला सर्च केली साहजिकच आहे त्याला Google कडून आपले Article दाखविले जाईल. आता समजले असेल कि कशा प्रकारे जगभरातून सुद्धा आपले ब्लॉग वाचले जाऊ शकते.  पण आणखी एक प्रश्न तुम्हला पडला असेल कि, आपण तर मराठी भाषेत लिहिले आहे. मग तो इंग्रजी वाचक असेल तर तो ब्लॉग कस वाचणार ? यावर सोपा उत्तर आहे. आज Google Translate च्या माध्यमातून आपण अनेक भाषेत एका भाषेतून दुसऱ्या भाषेत Traslate करून वाचू शकतो. same तो वाचक आपली माहिती google Translate करून वाचेल. फक्त आपल्याला फोकस करायचे आहे ते आपल्या लिहिण्यावर. 

Marathi Blogger च्या अडचणी 

नवीन ब्लॉग सुरु करतांना कोणत्याही Languages मध्ये सुरु करा अडचणी तर येणारच. आपली फक्त मानसिकता असते कि, मराठी ब्लॉग्स ला खूप अडचण जाईल पण मला वाटते मराठी किंवा कोणीतीही  आपली मातृभाषा असो त्यामध्ये आपण ब्लॉग्स लिहिले तर आपण आपल्या मनाने व जास्त प्रभावी पणे लिहू शकतो. 

समजा अडचणी कोणत्या येतील त्या बाबतीत विचार करायचे झालेच तर त्यामध्ये ब्लॉगिंग शिकण्याबाबत उपलब्ध असलेले Source हे मराठी भाषेत जास्त प्रमाणात उपलब्ध नाही आहेत. आपल्याला इंग्लिश किंवा हिंदी यासारख्या भाषेतून असलेले कोर्सेस पाहायला मिळतात. Youtube किंवा Google वर Blogging विषयी माहिती शोधली तर हिंदी मध्ये आपल्याला ब्लॉगिंग कोर्सेस मिळतील त्यामुळे शिकण्यास थोडीफार अडचण येऊ शकते. पण आपल्याला ती समजून घ्यावी लागेल, आजच्या घडीला थोड्याफार प्रमाणात मराठी मध्ये सुद्धा ब्लॉगिंग शिकण्यासाठी Youtube Video व Google वर माहिती उपलब्ध होत आहे. 

Marathi Language Blog लिहिणाऱ्या Marathi Blogger ना आणखी काही Blogging मधील गोष्टी आहेत जश्या Marathi Blog Back-links किंवा Marathi Keywords यामध्ये बऱ्याच अडचणी भासू शकतात पण Marathi  Blogging करू पाहणाऱ्या नवीन ब्लॉगर मित्रांनी सर्वात आधी ब्लॉगिंग ची माहिती काढून घ्यावी. नाहीतर मधेच नैराश्य येऊन ब्लॉगिंग सोडून द्याल व विनाकारण आपला वेळ व्यर्थ कराल हि परिस्थिती ओढवू नये. 

कोणत्या विषयावर Marathi Blog सुरु करावा ?

मित्रांनो, Blogging सुरु करण्यासंबंधी अनेक विषय आहेत. सर्वात आधी तुमची आवड कोणत्या विषयात आहे. किंवा कसा संबंधी तुम्ही जास्त काळ व effective लिहू शकता यावर फोकस करणे महत्वाचे राहील. इंटरनेटवर हजारो लाखो विषय आहेत ज्यावर रोज सर्च केले जाते. जी माहिती आज इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे ती माहिती तुम्ही आपल्या मराठी किंवा प्रादेशिक भाषेत सांगू शकता. 

मित्रांनो मनात कोणतेही पुर्वाग्रह न ठेवता Positive thinking ने एक नवीन Blog तुम्ही सुरु करू शकता. आणि एक फावल्या वेळेचा सदुपयोग करून नक्कीच आपला एक Successful Marathi Blog चालवू शकता. ब्लॉगिंग विषयी मी आपल्याला आलेले अनुभव या ठिकाणी मी सुद्धा Share करत असतो. त्यामुळे तुम्ही आपला ब्लॉग Follow करून अशा प्रकारची माहिती मिळवू शकता. 

धन्यवाद !


Sai Gedam ( Marathi Blogger/Youtuber )


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या